आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 वाशीम

Santosh Deshmukh Murder Case: उज्ज्वल निकमांनी कोर्टात वाल्मिक कराडचा डाव हाणून पाडला, म्हणाले,

शिंदे राम   107   24-06-2025 15:49:54

बीड (Beed News) 

वाल्मिक कराडने युक्तिवाद करत असतांना आपला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या (Santosh Deshmukh Murder Case) कटात आपला हात नसल्याचे सांगत, या प्रकरणी मकाको लागत नाही. असं सांगण्याचा प्रयत्न केला.

मात्र आरोपीचा या युक्तिवादाला आम्ही जोरदार विरोध केला. सोबतच न्यायालयाला हे स्पष्ट करून सांगितलं की, आरोपी विरोधात काय काय पुरावे आहे. त्या संपूर्ण पुराव्यांची जंत्री आम्ही न्यायालयासमोर सादर केली. त्याच प्रमाणे कटाचा मुख्य सूत्रधार कायम पडद्यामागे असतो आणि आपल्या कटपूतल्यांचे आधारे तो वाईट कृत्य करत असतो. मात्र या प्रयत्न आपण हाणून पाडला आहे. अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज (24 जून) बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाच्या सुनावणीवर भाष्य करत प्रतिक्रिया दिली.

 

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जुलैला

 

मा. न्यायालयासमोर आम्ही प्रतिपादन केलं असून येत्या 7 जुलैपर्यंत न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. असेही सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जुलै रोजी होणार असून आज कोर्टाचे कामकाज तीन तास चालले. यावेळी आरोपी वाल्मीक कराडच्या वकिलांकडून दोन तास युक्तिवाद करण्यात आला. तर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी एक तास युक्तीवाद केला. दरम्यान यावेळी केवळ दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद झाला, अशी माहितीही आता समोर आली आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज (24 जून) बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. मागील सुनावणी दरम्यान न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची देखील उपस्थिती होती.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.