आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 नाशिक

पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी सवलतीची बस पास योजना राबवा - शत्रुघ्न काटे

नितीन देशपांडे   74   21-06-2025 20:44:12

भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांचे महापालिका आयुक्तांना मागणीचे निवेदन

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) बस प्रवासासाठी सवलतीच्या दरात बस पास योजना राबविण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिले आहे.

काटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी PMPML बस प्रवासाकरिता २५% ते ७५% सवलतीच्या दरातील बस पास योजना सुरू केली होती. विविध अटी आणि नियमांसह ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती.

शहरातील अनेक विद्यार्थी खडकी, पुणे, देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरात शिक्षण घेण्यासाठी जातात. या विद्यार्थ्यांना २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातही PMPML बसेसमधून प्रवास करण्यासाठी २५% ते ७५% सवलतीच्या दरातील बस पास योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

या मागणीवर तातडीने कार्यवाही करून या योजनेची अंमलबजावणी करण्याची विनंती काटे यांनी केली आहे. तसेच, या संदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती आपल्याला कळविण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. या योजनेमुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांच्या शिक्षणासाठीचा प्रवासाचा खर्च कमी होण्यास मदत होईल, असे मत काटे यांनी मांडले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.