आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 नंदुरबार

शहराध्यक्ष शत्रुघ्न शत्रुघ्न काटे यांनी केले संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सारथ्य

नितीन देशपांडे   588   20-06-2025 08:56:43

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी -: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन झाले. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी  पालखी कार्यकर्त्यांसमवेत केले रथाचे सारथ्य केले.

राजकीय लोकप्रतिनिधी आणि सामाजिक प्रमुख व पक्ष कार्यकर्त्यांनी वारकरी सांप्रदायाची पताका अभिमानाने खांद्यावर घ्यावी, असा सुरेख संगम यानिमित्ताने पहायला मिळाला. 

संत तुकोबांच्या पालखीचे भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे दिमाखात स्वागत करण्यात आले. अवघी उद्योगनगरी तुकोबांच्या नाम गजराने दुमदुमून गेली असून, टाळ -मृदुंगाच्या तालावर वारकरी ठेका धरत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याच्या स्वागताची सर्व तयारी केली होती. 

आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरात भक्तिभावाने आणि जल्लोषात दाखल झाला. शहराच्या भक्ती-शक्ती चौकात वारीचे भव्य स्वागत करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे  यांनी पालखी सोहळ्याचे सारथ्य करत श्रद्धेचा अनोखा संदेश दिला. शहरात पालखीचे आगमन होताच, टाळ-मृदुंगांच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात वारीच्या आगमनाने वातावरण भारावून गेले. वरुणराजानेही वारीच्या स्वागतासाठी हजेरी लावली, आणि त्या सरींमध्ये हजारो वारकऱ्यांचा मेळा एकत्रितपणे आकुर्डीतील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.