आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 मुंबई शहर

घरातील वृद्धांची सेवा हाच आदर्श प्रपंच - शत्रुघ्न काटे

शिंदे राम   13   14-06-2025 19:12:36

चिंचवड प्रतिनिधी :-  ज्येष्ठ नागरिक  महासंघाचा 22 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज पिंपरी चिंचवड शहरात रामकृष्ण मोरे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला,

ज्येष्ठांना उर्वरित आयुष्य सुखसमाधानाने जगता येईल, असे काम सर्वांनी केले पाहिजे घरातील जेष्ठ हे मार्गदर्शक असतात त्यांना जीव लावा त्यांच्याकडे अनुभवाचे विशाल भंडार असते, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेचे आमदार उमाताई खापरे शहरातील प्रमुख पदाधिकारी जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी ज्येष्ठांना उर्वरित आयुष्य सुखसमाधानाने जगता येईल, असे काम सर्वांनी केले पाहिजे.असे उद्गार त्यांनी काढले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.