आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 गोंदिया

योगेश बन्सी शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड

शरद लाटे  200   13-06-2025 09:00:10

पुणे प्रतिनिधी -: नेरे गावचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते योगेश भाऊ बन्सी शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे,

त्यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पुणे  जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते पत्र देऊन केली आहे. 

यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश मोरे, मुळशी तालुका युवक अध्यक्ष सुखदेव मांडेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते

योगेश भाऊ शिंदे हे राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

आयटी नगरी लगतच नेरे गावाचे ते उपसरपंच राहिले सामाजिक व राजकीय चळवळीला त्यांचा मोठा हातभार लागलेला दिसून येत आहे त्यामुळे त्यांचे झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.