पुणे (Pcmctahalka.in) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबत आदेश दिला आहे.
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची वाकड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
विशेष शाखेमध्ये कार्यरत असलेले जितेंद्र कोळी यांची सांगवी पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. तसेच, सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले महेश बनसोडे यांच्याकडे निगडी पोलीस ठाण्याची जबाबदारी दिली आहे.