आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 गोंदिया

हिंजवडीत जमिनीच्या वादात दाखविले कोयते ;पोलिसांकडून गुन्हा दाखल

नितीन देशपांडे   608   08-06-2025 19:57:34

पुणे प्रतिनिधी - शिक्षणाची पंढरी म्हणून नावलौकिक असलेल्या पुणे (Pune) शहराची औद्योगिक नगरी, हिंजवडी आयटी नगरी अशीही ओळख बनली असून येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे, बिल्डर लॉबी, गुंठा मंत्री आणि रिअल इस्टेटमुळे पुणे जिल्ह्यात गुंडगिरी व गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

येथील या व्यवसायामुळे आर्थिक व्यवहारातून टोळ्या निर्माण होतानाचे चित्र देखील यापूर्वी दिसून आले आहे. मुळशी पॅटर्न हा चित्रपट देखील पुणे जिल्ह्यातील वाढते औद्योगिकरण आणि जमिनीच्या (Land) खरेदी-विक्री व्यवहारातून वाढलेल्या गुंडगिरीवरच आधारित आहे. आता, पुन्हा एकदा जमिनीच्या  वादातून हिंजवडी येथे काल महिलांवरती कोयते उभारण्यात आले व साफसफाई करण्यासाठी आलेल्या कामगारांना मारहाण करण्यात आली असा गुन्हा हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे,

तक्रारदाराने दिली घटनेची माहिती

राहुल अरुण जांभुळकर हिंजवडी पोलीस स्टेशन येथे हजर राहून जवाब दिला आहे, हिंजवडी मधील सर्वे नंबर 258 /4/ ब, माझ्या कुटुंबाच्या मालकी हक्काचे मिळकत क्षेत्राबाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल असून सदरील निकाल आमच्या बाजूने लागला आहे, तरी देखील जालिंदर जांभुळकर व इतर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

पोलीस स्टेशनच्या FIR नुसार, दिनांक 07/06/2025 मी बोरवेल व प्लॉटच्या दुरुस्तीसाठी साफसफाईसाठी कामगारांना घेऊन प्लॉटमध्ये गेलो असता त्या जागेवरती प्रदीप भिताडे, जालिंदर जांभुळकर, सोमनाथ जांभुळकर, प्रदीप बाळासाहेब गायकवाड, जय बिरजे, बाबासाहेब साखरे, संदीप बोडके, अमित मोरे, संदिपान शिंदे व इतर 15 ते 20 जण, लोखंडी पहार, कोयता लाकडी काठ्या, व दगडाने आम्हाला मारहाण करू लागल्याने आम्ही तिथून बाहेर पडलो, त्यानंतर पोलीस जमावल्यानंतर हा जमाव पांगला गेला, आमच्या जागेत पाय ठेवायचा नाही अन्यथा तुम्हाला आम्ही मारू अशी धमकी दिली आहे त्यामुळे वरील आरोपींवर हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशन करत आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.