आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 गोंदिया

अखेर निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलं नेपाळ बॉर्डर‌ येथून अटक

शिंदे राम   821   30-05-2025 16:42:48

पुणे (Pcmctahalka.in) वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डर‌ येथून बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता. अखेर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्याला शोधून काढलं आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या चुलत्यांसह इतरांना धमकावणाऱ्या आणि इतर आरोप असणारा निलेश चव्हाण फरार होता. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी- चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळ बॉर्डर‌ येथून बेड्या ठोकल्या आहेत. 

पिंपरी- चिंचवड पोलिसांची सहा पथकं निलेश चव्हाणचा शोध घेत होते. तो दुसऱ्या राज्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु, तो नेपाळ बॉर्डर‌ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आहे. लवकरच त्याला पिंपरी- चिंचवडमध्ये आणले जाणार आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.