आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 बीड

बीडमधील भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू

नितीन देशपांडे   234   27-05-2025 09:46:02

बीड - 26 मे रोजी पावसाने धुमाकूळ घातलेला असताना बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडच्या गढी परिसरात सोमवारी रात्री उशीरा घडलेल्या भीषण अपघातात गेवराई येथील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ घडली असून, अपघातामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडला.

प्राथमिक माहितीनुसार, गेवराई शहरातील काही नागरिकांची चारचाकी गाडी गढी परिसरात तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती. त्यामुळे हे सहा जण गाडी आणण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. तेव्हा भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने थेट त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

 

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.