आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पुणे ग्रामीण

पुणे सोलापूर महामार्ग काही काळा साठी बंद

अजिंक्य एकाड   37   25-05-2025 17:34:27

पुणे सोलापूर महामार्गावरील भिगवन परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे काही काळासाठी महामार्ग बंद करण्यात आला आहे.

 

 गेल्या तीन ते चार दिवसापासून अवकाळी पावसाने पुणे ग्रामीण पट्ट्यामध्ये हजेरी लावली आहे. भिगवन,मदनवाडी स्वामी चिंचवली, इंदापूर  ह्या भागात दोन ते तीन दिवसापासून पाऊस पडत आहे.

 

 मात्र आज स्वामी चिंचवली येथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने नागरिकांचे आणि शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

 महामार्गा लगत असणाऱ्या अनेक दुकानांमध्ये पाऊसाचे पाणी गेल्या मुळे आर्थिक नुकसान झाले आहे.

 शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेऊन कांदा साठवणूक शेतामध्ये केली होती मात्र पावसाच्या पाण्यामुळे कांद्याचे  नुकसान झाले आहे.

 पुणे सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.