आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 गडचिरोली

बाणेर पोलीस स्टेशनमधील ३ पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेतल्यामुळे निलंबित

शिंदे राम   1317   21-04-2025 10:04:20

पुणे- पोलिसात खळबळ माजवणारी बातमी समोर आले आहे. बाणेर पोलीस स्टेशनमधील ३ पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेतल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. तीन हजार रूपयांची लाच घेतल्याच्या आरोपांमुळे त्यांच्यावर तडकाफडकी ही कारवाई करण्यात आली आहे.

सोसायटीच्या चेअरमनने पोलिसांना किती पैसे द्यायचे याबाबत विचारले. त्यावेळी तिघांनी संगनमत करुन पाच हजार रुपयांची मागणी केली. शेवटी तडजोडीनंतर ३००० रुपये स्विकारले. याबाबत उपायुक्तांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई करत शिंदे, त्रिंबके आणि इंगळे या तिघांनाही निलंबित केले. दरम्यान, चार दिवसांपूर्वी याच पोलीस स्टेशन मधील एका शिपायाने वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीत बसून फोटो काढला होता, त्याच्यावरही कारवाई करण्यात आलेली नाही. याच्यावर कारवाई कधी होईल असा प्रश्न होता उपस्थित होतो.

रात्री साडे अकरा वाजता बीट मार्शल पार्किंगच्या फ्लोरिंगचे काम सुरू होते तेथे गेले. "का काम सुरु केले आहे. बंद करुन टाका, तुमच्या विरुद्ध डायल ११२ वर तक्रार आली आहे. "तुम्ही आमच्या सोबत पोलीस स्टेशनला चला" असे म्हणाले. त्या दोन्ही पोलिसांपैकी एकाने तुम्ही एक काम करा, आम्हाला थोडे पैसे द्या, तुमचे काम १५ ते २० मिनिटात पूर्ण होईल, परत कोणाची तक्रार आली तर आम्ही अर्ध्या तासाने येतो, अर्ध्या तासाने आम्ही आल्यानंतर काम सुरू नाही पाहीजे" असे म्हणाला.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.