आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात लागणार यांची वर्णी ; राष्ट्रवादीतून व शिवसेनेतून अनेक नावे चर्चेत

शिंदे राम   1174   19-04-2025 09:56:51

मुंबई प्रतिनिधी- (Modi grovment) 

नवी दिल्ली : पुढील महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्‌यात केंद्रातील मोदी सरकारमध्ये फेरबदल होण्याची जोरदार चर्चा आहे.

भाजपच्या नवीन अध्यक्षाची निवड या महिन्याच्या अखेरीस होऊ शकते. त्यानंतर काही नेत्यांना सरकार आणि संघटनेतून हलवले जाऊ शकते. त्यामुळे मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात, असे यामागील कारण असे सांगितले जात आहे.

 

मोदी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनंतर महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने भाजपवर दबाव वाढवला आहे. या दोन्ही पक्षांचे म्हणणे आहे की, त्यांना सरकारमध्ये कॅबिनेट पदे देण्यात यावीत. यावेळी त्यांना महाराष्ट्रात मोठ्या संख्येने जागा मिळाल्या आहेत. भाजपच्या विजयासाठी त्यांनी दिवसरात्र काम केले आहे. अशा परिस्थितीत भाजपने याचा आदर करावा आणि त्यांना मंत्रिपद द्यावे, असे या पक्षांचे म्हणणे आहे.

शिंदे गट त्यांचे नेते श्रीकांत शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी करत आहे. त्याच वेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी त्यांच्या पक्षालाही मंत्रिपद मिळायला हवे, असे म्हटले आहे. त्यांचे सर्वात ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल सर्व पात्रता असूनही मंत्री होऊ शकले नाहीत. याचे कारण ते मागील यूपीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. अशा परिस्थितीत त्यांना राज्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव चुकीचा होता. त्यात सुधारणा होणे आवश्यक आहे. त्यांना मोदी सरकारमध्ये कॅबिनेट पद देण्यात यावे. जेणेकरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही योग्य तो न्याय मिळू शकेल.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.