आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Beed Crime : बीडमधल्या आगे हत्या प्रकरणात वेगळा ट्विस्ट, आरोपीच्या बायकोने

नितीन देशपांडे   82   19-04-2025 09:36:47

बीड प्रतिनिधी (Beed news) - 

बीडमधील भाजपचे लोकसभा विस्तारक बाबासाहेब आगे यांच्या हत्या मागील सत्यता आरोपीची पत्नी आणि वडिलांनी सांगितली आहे. दोघांनी सनसनी खुलासा करत अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम लावलाय.

आरोपी खोटं बोलत असल्याचं निदर्शनास आलं आहे. आता खुद्द आरोपीच्या पत्नीने याबाबत खुलासा केला आहे. मात्र, आगे कुटुंबाची बदनामी झाल्यामुळे बाबासाहेब आगे यांच्या पत्नी आणि कुटुंबाला याचा नाहक त्रास होत आहे. यामुळेच गावकऱ्यांनी याविरोधात कॅण्डल मार्च काढला होता. माजलगाव शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत आगे कुटुंबीयांसाठी शोकसभा आणि आर्थिक मदत रॅली काढली. यादरम्यान आता या प्रकरणाला वेगळाच ट्विस्ट बघायला मिळत आहे.

 

परंतु आता या खून प्रकरणातील आरोपी नारायण फपाळ याच्या पत्नीने खरं कारण सांगितलं असून बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणे होते, त्यांनी केवळ भाऊ म्हणून आम्हाला मदत केली. माझ्या पतीला दारुचं व्यसन आहे. यातून ते नेहमी मला शिवीगाळ करायचे. गावातील काही व्यक्तींचे नाव घेवून संशय घ्यायचे. बाबासाहेब आगे यांच्याबद्दल देखील त्यांच्या मनात संशय होता. यातूनच हा प्रकार घडला, असं नारायण फपाळच्या पत्नीनं सांगितलं. बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणेच होते पण सांगूनही पती ऐकत नव्हते, असेही फपाळच्या पत्नीनं सांगितलं आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.