पुणे-
खेड शिवापूर येथील ससेवाडी जवळ एका प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. आग लागल्यानंतर बसमधील प्रवाशांनी उड्या मारल्या.
बसला नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाही. बसला आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून, नागरिक देखील येथे जमा झाले आहेत. बसला आग लागल्यानंतर आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले होते.