Beed (Bhagavan baba) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता पहिल्यांदाच सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर येणार आहेत.
आज संत भगवान बाबा गडाचा नारळी सप्ताहाची सांगता शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावी होणार आहे. यानिमित्ताने महंत नामदेव शास्त्री यांच्या काल्याचे किर्तन आहे. यासाठी सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकत्र पाहायला मिळणार आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. त्यानंतर आता सुरेश धस आणि धनंजय मुंडे दोघेही एकाच मंचावर येणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.