आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 धुळे

गुंड तुझ्या घरातच; निलेश घायवळवर जबरी हल्ला, कुस्तीच्या फडातच चोपला

शिंदे राम   151   12-04-2025 10:29:16

पुणे (Pcmctahalka.in) 

Nilesh Ghaywal : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर जबरी हल्ला झालाय. जत्रेनिमित्त गावी आलेल्या घायवळकर याला मारहाण झाली.

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावरवर भूमध्ये हल्ला करण्यात आला. भूम तालुक्यातील आंदरूड गावाचे ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला आहे. हल्ला करुन फरार झालेल्या हल्लेखोराचा वाशी पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. आंदरूड येथे यात्रेनिमित्त प्रसिद्ध कुस्तीपटू थापाच्या कुस्ती वेळी हा प्रकार घडला. यात्रेतील कुस्तीच्या स्पर्धेचे आयोजन गुंड निलेश घायवळ याने केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

घायवळ हे आखाड्यात पैलवानाची भेट घेत असताना त्याच्यावर हल्ल्याचा प्रकार घडला आहे. हल्ला करणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा पैलवान असल्याची माहिती समोर आली. निलेश घायवळ याच्यावर हल्ला केल्यानंतर एकच गोंधळ उडाला. दरम्यान हल्ला करणाऱ्या तरुणाला निलेश घायवळच्या कार्यकर्त्यांनी मारहाण देखील केली. तर हल्ला करणारा तरुण पळून गेला असून वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनेचा तपास करत आहेत दरम्यान याबाबतचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

दरम्यान, या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून विविध चर्चांना उधाण आले आहे. निलेश घायवळ याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी हल्ल्यामागील कारणांचा तपास सुरू केला असून, लवकरच हल्लेखोराला ताब्यात घेण्याचा दावा केला आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.