मुंबई प्रतिनिधी (MLA Maharashtra) अधिवेशनात सहभागी होणाऱ्या आमदारांना पगार असतो का? आणि जर असला तर त्यांना दर महिन्याला किती पगार मिळतो? हा सर्व सामान्यांना पडलेला प्रश्न असतो. आमदार म्हटला तर तो त्याच्या मतदार संघांचा राजाच असतो. त्यामुळे त्याच्या पगाराची उत्सुकता ही प्रत्येकालाच असते. पगारा शिवाय आमदारांना काय काय सुविधा मिळतात ते ही आपण पाहाणार आहोत. तुम्ही आमदाराचा महिन्याचा पगार आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा पाहिलात तर नक्कीच म्हणाल की राव एकदा तरी आमदार व्हावं.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांना म्हणजेच आमदारांना वेतन, भत्ते आणि अन्य सोयीसुविधा दिल्या जातात. या गोष्टी त्यांना भरघोष मिळतात. आमदारांना 10 जुलै 2024 प्रमाणे किती वेतन आणि भत्ता मिळतो ते आपण पाहाणार आहोत. महाराष्ट्र विधानमंडळातील सदस्याला दरमहा मूळ वेतन 1,82,200 रुपये इतके मिळते. त्यात महागाई भत्ता (50%) प्रमाणे दरमहा 91,100 रुपये मिळतो. त्यामुळे भत्ते मिळून एकूण पगाराचा आकडा आणखी वाढतो. त्यामुळे आमदारांना मिळणारा पगार भरघोष असतो.
शिवाय दूरध्वनी सुविधा म्हणून प्रत्येक महिन्याला 8,000 रुपये मिळतात. टपाल सुविधा दरमहिन्याला 10,000 रुपये इतकी रक्कम पगारात दिली जाते. संगणक चालकाची सेवा प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये मिळते. पगार आणि भत्ते मिळून संपूर्ण महिन्याचा पगार तब्बल 3,01,300 रुपये इतका आहे. तसेच प्रवासाच्या बाबतीतही महाराष्ट्र विधानमंडळातील सदस्यांना मोठ्या प्रमाणात सुविधा मिळतात. आमदार पती- पत्नीला प्रवासाकरिता राज्याबाहेरील रेल्वे कुपनचा लाभ घेता येऊ शकेल. आमदारांना एसटी सेवा मोफत असते.
आमदाराला मिळणारा एकूण पगार
मूळ वेतन दरमहा 1,82,200
महागाई भत्ता (50%) प्रमाणे दरमहा 91,100
दूरध्वनी सुविधा दरमहा 8,000
टपाल सुविधा दरमहा 10,000
संगणक चालकाची सेवा दरमहा 10,000
मिळण्यासाठी रक्कम एकूण 3,01,300
आमदारांना विमान प्रवासातही सवलत दिली जाते. जर आमदारांना राज्यातल्या राज्यात विमानाने प्रवास करायचा असेल तर त्यांना 32 वेळा एकेरी विमान प्रवासाची सवलत मिळते. तर त्यांना राज्या बाहेर इतर राज्यात जायचं असेल तर अशीच सवलत त्यांना आठ वेळा मिळते. दरम्यान आमदार निवृत्त झाले, किंवा माजी आमदार झाले तर त्यांनाही पेन्शन लागू होते. त्यांच्या पश्चात ही पेन्शन त्यांच्या पत्नीला ही दिली जाते.
आमदारांना राज्यातल्या राज्यात विमानाने प्रवास करायचा असेल तर त्यांना 32 वेळा एकेरी विमान प्रवासाची सवलत मिळते.