मांजरी प्रतिनिधी - : (Mahanagar palika) हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी येथील अयोध्या कॉलनी ते झेड कॉर्नर या ठिकाणच्या रस्त्याच्या कामासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून 20 लाख रुपये निधी मंजूर झाला होता,
या रस्त्याच्या कामासाठी पुणे शहर शिवसेनेचे तथा पुणे महापालिकेचे शासन नियुक्त नगरसेवक अमर घुले पाठपुरवठा करत होते,
34 गावांच्या मीटिंगच्या दरम्यान त्यांनी मांजरी व परिसरातील अनेक समस्यांचे पत्र रस्ता लाईट ड्रेनेज या संदर्भात महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे दिले होते त्यांनी त्याची दखल घेत पुढील कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या त्यानंतर त्यातील अनेक कामांना मोठे यश आले.
अयोध्या कॉलनी ते झेड कॉर्नर या ठिकाणचा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे एक्सीडेंटचे प्रमाण वाढले होते नगरसेवक अमर घुले यांनी पाठपुरवठा करत लवकरच रस्त्याचे काम सुरू केले याबद्दल त्या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.