आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 चंद्रपूर

आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शत्रुघ्न काटे यांच्या वतीने ‘ओपन रोलर स्केटिंग स्पर्धा-२०२५’चे आयोजन

नितीन देशपांडे   142   07-04-2025 14:15:16

चिंचवड (Pcmctahalka.in):- भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे स्पोर्ट अकॅडमी यांच्या सौजन्याने चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती क्रीडांगण याठिकाणी “ओपन रोलर स्केटिंग स्पर्धा-२०२५” चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार शंकरशेठ जगताप यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वयोगट ५ वर्षे ते १४ वर्ष वयोगटातील ५०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत ड्रीम क्लब, शिशा स्केटिंग क्लब, LJ स्केटिंग क्लब, साई स्केटिंग क्लब आणि वर्ल्ड पीस स्कुल आळंदी यांनी अनुक्रमे पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा क्रमांक पटकविल्या बद्दल चषक तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.आपले शरीर लवचिक राहण्यासाठी अनेक खेळ खेळले जातात. त्यापैकीच एक खेळ म्हणजे स्केटिंग. मुलांमध्ये अगदी लहानपणापासूनच स्केटिंगचे आकर्षण असते. पायाला चाकं लावून भन्नाट वेगाने पुढे जाणे असे त्यांना वाटत असते. पण, त्याचेही एक शास्त्र आहे, काही नियम आहेत हे त्यांना माहित नसते. रोलर स्केटिंग हा चपळतेने व कौशल्यपूर्ण खेळला जातो. शरीराची लवचिकता वाढविणारा हा खेळ आहे. यामध्ये मान, हात, पाय लवचिक होतात. त्यामुळे शरीराचा सर्वांग व्यायाम होतो.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आपले विचार व्यक्त केले आणि संगितले की “स्केटिंग ही केवळ एक आनंददायी क्रिया नाही तर त्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीतील व्यायाम म्हणून स्केटिंगमध्ये सहभागी होणे तुम्हाला सक्रिय राहण्यास आणि तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करू शकते. एकंदरीत, स्केटिंगमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती आणि स्नायूंची ताकद सुधारण्यापासून ते संतुलन, लवचिकता आणि मानसिक आरोग्य सुधारण्या पर्यंत अनेक आरोग्य फायदे मिळतात तथापि, स्केटिंग करताना सुरक्षितता महत्त्वाची असते. संरक्षक उपकरणे घालणे आणि स्केटिंग रिंकचे नियम आणि कायदे पाळणे महत्त्वाचे बनते.”
 
 
 
यावेळी भाजप जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे, भानुदास काटे पाटील, मनोज ब्राह्मणकर, राजेश पाटील, सुप्रिया पाटील, अशोक वारकर काका, प्रविण कुंजीर, बाळकृष्ण परघळे, संभाजी मगर, दिपक गांगुर्डे, शंतनू प्रभुणे, सुशील भाटिया, नितेश जगताप, संकेत चोंधे, सनी बारणे, प्रसाद कस्पटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.