पुणे (Pcmctahalka.in)
आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 3 एप्रिल) घडली. पुण्यातील प्रसिद्ध अशा दीनानाथ मंगशेकर रुग्णालयाने केलेल्या आडमुठेपणामुळे महिलेला जीव गमवावा लागल्याचे बोलण्यात येत आहे.या प्रकरणी आता पुण्यातील नागरिकांसोबतच विविध संघटना आक्रमक झालेल्या आहेत. तर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाने या रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन सुरू केले आहे. शिंदे गटाने लोकांकडून चिल्लरची भीक मागून ती रुग्णालय प्रशासनाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका महिलेला न्याय देण्यासाठी दोन्ही शिवसेना बाजूबाजूला उभे राहात आंदोलन करत आहे
जाऊन चौकशी करणार आहेत. याबाबत ऑडिट रिपोर्ट चौकशी केल्यानंतर सादर करणार आहेत
श्रीमती तनिशा सुशांत भिसे या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथे प्रसुतीसाठी आल्या असता त्यांना अॅडमिशनसाठी १० लाखाची मागणी केली व त्यांना दाखल करुन घेतले नाही. त्यानंतर सदर पेशंट मनिपाल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने याबाबतच्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रसिध्द झाल्या आहेत.
Pune News: धक्कादायक! आधी १o लाख भरा; रुग्णालयाच्या नियमामुळे जुळ्यांना जन्म देणाऱ्या आईचा मृत्यू, हॉस्पीटल प्रशासनानं दिलं स्पष्टीकरण
सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी खालील प्रमाणे चौकशी समिती गठित करण्यात येत आहे.
१) डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडल, पुणे अध्यक्ष
२) डॉ. प्रशांत वाडीकर, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुगे सदस्य
३) डॉ. नागनाथ यम्पल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय औंध, पुणे -सदस्य
४) डॉ. निना बोराडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पुणे महानगरपालीका, पुणे सदस्य
५) डॉ. कल्पना कांबळे, वैद्यद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे सदस्य
तरी सदर प्रकरणी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे व मनिपाल हॉसिपटल, पुणे येथे भेट देऊन सखोल चौकशी करुन चौकशी अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह व आवश्यक त्या दस्तऐवजासह तात्काळ या कार्यालयास सादर करावा.