6 कोटी लोकांसाठी गुडन्यूज! आता या खात्यात नॉमिनी अपडेशन मोफत; सरकारचा निर्णय
केंद्र सरकारने गुरुवारी मोठा निर्णय घेत पीपीएफ खातेधारकांना (PPF Nominee) दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
पीटीआयनुसार सरकारने नोटिफिकेशनच्या माध्यमातून पीपीएफ खात्यात नॉमिनी जोडण्याच्या नियमांत बदल केले आहेत. पीपीएफ खात्यांत नॉमिनी डिटेल्स अपडेट करण्यासाठी काही आर्थिक संस्थांकडून पैसे घेतले जात होते. पण आता हे काम अगदी मोफत होणार आहे असे अर्थमंत्री यांनी त्यांच्या ट्विटर वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरकारने घेतलेल्या या निर्णयाची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी एक अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. 2 एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की PPF Account मध्ये नॉमिनी अपडेशनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सरकारी बचत संवर्धन सामान्य नियम 2018 मध्ये हा बदल करण्यात आला आहे. याआधी सरकार द्वारे संचालित केल्या जाणाऱ्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये नॉमिनी कॅन्सल करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात येत होते.
PPF खात्यात जर एखादा व्यक्ती महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे गुंतवणूक करत असेल तर त्याला जमा रकमेवर पूर्ण महिन्याचे सुद्धा व्याज मिळते. पण जर 5 तारखेनंतर गुंतवणूक करत असाल तर 5 ते 30 तारखे दरम्यान सर्वात कमी बॅलन्सवरच व्याज मिळेल.