आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पुणे शहर

Manoj Kumar: ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड

नितीन देशपांडे   132   04-04-2025 08:30:20

पुणे (monoj Kumar) चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांना त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी आणि 'भारत कुमार' या नावाने विशेष ओळख मिळाली होती.

२४ जुलै १९३७ रोजी मनोज कुमार यांचा जन्म झाला होता. त्यांचं खरं नावं हरिकृष्ण गिरी गोस्वामी असून ते सर्व कलाकारांसाठी प्रेरणास्थान होते. मनोज कुमार यांनी केवळ अभिनयच केला नाही तर "शहीद" (1965), "उपकार" (1967), "पूरब और पश्चिम" (1970) आणि "रोटी कपडा और मकान" (1974) अशा अनेक देशभक्तीपर चित्रपटांचे दिग्दर्शनही केलंय.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.