आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 चंद्रपूर

जुळ्या मुलांना जन्म पण हॉस्पिटलच्या मनमानी कारभारामुळे आईचा मृत्यू

नितीन देशपांडे   353   03-04-2025 23:24:39

पुणे (Mangeshkar Hospital Pune) जुळ्या मुलांना जन्म पण हॉस्पिटलच्या मनमानी कारभारामुळे आईचा मृत्यू

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळं एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे वेळेत उपचारांअभावी मृत्यू झालेली महिला ही भाजप आमदाराच्या पीएची पत्नी होती.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचार सुरु करण्यासाठी फोन येऊन देखील रुग्णालयानं प्रवेश नाकारल्यानं मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू

 

दरम्यान, तनिषा भिसे यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला पण प्रसूती दरम्यान गुंतागुंत वाढल्यानं आईचा मृत्यू झाला. त्यामुळं दोन जिवांना जीवदान देत आईचा अंत झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे.

 

Mangeshkar Hospital मधील तनिषा भिसेंच्या मृत्यूला जबाबदार कोण? मृताच्या वहिनीनं थेट 'त्या' दोघांचं नावच घेतलं, म्हणाली...

वेळेत उपचार मिळाले असते तर....

 

दरम्यान, मृत्यू पावलेल्या मोनाली भिसे यांची नणंद प्रियांका पाटे यांनी सांगितलं की, "तनिषा भिसे माझी वहिनी लागते. २८ तारखेला रक्तस्त्राव होत असल्यानं तिला दीनानाथमध्ये नेलं होतं. त्यावेळी डॉक्टर म्हणाले की, तुम्हाला २० लाख रुपये भरावे लागतील, तुमची ऐपत नसेल तर ससून रुग्णालयात जा, असा सल्लाही देण्यात आला. याच काळात वहिनीचा बी पी वाढला आणि त्यांना खूप टेन्शन आलं. यावेळी रुग्णाला ओपीडीमध्ये शिफ्ट केलं, २ तास रुग्ण तिथेच होता.

 

या काळात एकही डॉक्टर रुग्णाला बघायला तिथं आला नाही. उलट नंतर प्रशासनानं आम्हाला पूर्ण १० लाख रुपये भरा, त्याशिवाय पेपर करणार नाही असं सांगितलं. मीनाक्षी गोसावी या तिथल्या डॉक्टर म्हणाल्या, ५ लाख रुपये भरा तेव्हा उपचार होतील. डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी स्वतः सांगितलं की, १० लाख रुपये भरा. आम्ही ३ लाख रुपये भरायला तयार होतो, या सगळ्या गोंधळात २ ते ३ तास लागले. वेळेत उपचार झाले असते तर आमची वाहिनी वाचली असती. या प्रकाराला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास आणि बिलिंग डिपार्टमेंटमधील मॅडम जबाबदार आहेत"


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.