पुणे- याशिवाय बाणेर बालेवाडी भागातील नागरिकांची सातत्याने नाट्यगृहाची मागणी होत आहे. त्याशिवाय कोथरुड मध्येही शास्त्रीय नृत्यासह इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी संकुल उभारण्याची मागणी स्थानिक नागरीक तथा कलाप्रेमींकडून सातत्याने होत आहे. दोन्ही मागण्यांच्या अनुषंगाने जागा आणि नाट्यगृह तथा संकुल उभारण्यासाठी अपेक्षित खर्च आदींवर सविस्तर अध्ययन करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच, या विषयांसह मतदारसंघातील इतर समस्यांसंदर्भात वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल तयार करण्याचे निर्देश ना. पाटील यांनी बैठकीत दिले. सदर अहवालाच्या अनुषंगाने आयुक्तांसोबत बैठक घेऊन मार्ग काढू, असे यावेळी आश्वास्त केले.