Beed (Beed )बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात या महिलेचं कनेक्शन उघड होणार असून यामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळू शकतं. त्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू आहे. मयत मनीषा बिडवेचा मोबाईल गायब असून हा मोबाईल आरोपीकडेच असल्याचा पोलिसांचा दावा आहे. मनीषा बिडवेच्या मोबाईलमध्ये नेमकं दडलंय काय? याचं गूढ वाढलं असून सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मयत महिलेचा सहभाग असल्याचा आरोपानंतर हे हत्या प्रकरण चर्चेत आले आहे.
संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी...
संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी कळंब येथे आणलं जाणार होतं असं तपासात यापूर्वीच उघड झाला आहे. संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी या महिलेकडेच आणलं जाणार होतो असा आरोप देखील होत आहे. पोलीस याच अनुषंगाने कसून तपास करत आहेत.लवकरच या महिलेचं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे कनेक्शन उघड होणार आहे दरम्यान मृत मनीषा बिडवेचा मोबाईल गायब झाला आहे. हा मोबाईल आरोपींनीच घेतला असावा असा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपीही स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. कळंबपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर या आरोपीला पकडण्यात आलं आहे. रामेश्वर उर्फ राम्या भोसले असं या आरोपीचं नाव आहे