पुणे-
50 रुपयासाठी पोलिस खात्याची नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. जळगावमध्ये तीन वाहतूक पोलिसांचं निलंबन करण्यात आले आहे. यामुळे वाहतूक पोलिसांमध्ये खळबळ माजली आहे. या पोलिसांचा संशयास्पद व्हिडिओ व्हायरल झाला होता.यानंतर पोलिस खात्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
ट्रकचालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने चौकशी करून पाचोरा पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस पवन पाटील याला निलंबित केले आहे. प्राथमिक तपासात पवन पाटील याने ट्रकचालकाकडून 50 रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले. व्हिडिओमध्ये आणखी दोन पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याने त्यांची भूमिका संशयास्पद आढळून आल्यामुळे त्यांनाही निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे