आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 सातारा

सिकंदर' लीक! रिलीजच्या दिवशी सलमानच्या सिनेमाला मोठा फटका

नितीन देशपांडे   107   30-03-2025 13:25:19

पुणे (Salman khan) सलमान खानला मोठा फटका; सिकंदर' लीक! 

सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट 'सिकंदर' 30 मार्च 2025 रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. मात्र, रिलीज होताच काही तासांतच हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याची धक्कादायक घटना घडली

चित्रपट निर्मात्यांसाठी ही मोठी अडचण निर्माण झाली आणि पायरसीमुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. एक दोन ठिकाणी नाही तब्बल 600 पेक्षा अधिक वेबसाइट्सवर सिकंदर लीक झाला आहे.

निर्मात्यांनी घेतली पोलिसांची 

'सिकंदर' चित्रपटाच्या निर्मात्यांनी लीकच्या वृत्तानंतर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आणि सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून चित्रपट हटवण्याची मागणी केली. या प्रकरणात तातडीने कारवाई करत अधिकाऱ्यांनी 600 पेक्षा जास्त वेबसाइट्सवरून चित्रपट हटवला. मात्र, चित्रपट आधीच मोठ्या प्रमाणात लीक झाल्याने त्याचे नुकसान झाले होते.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.