पुणे (Pcmctahalka.in) बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदीत मोठा स्फोट घडला आहे. मध्यरात्री अशाप्रकारे स्फोट घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तीन ते चार तासांत पोलिसांनी या घटनेचं गूढ उलगडलं आहे.याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी सांगितलं की, मशीद स्फोट प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहेत. गावामध्ये शांतता आहे. बीड जिल्ह्यातील सर्व लोकांना आव्हान आहे की शांतता राखावी. झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे. पोलीस तत्पर आहे. लगेच पोलिसांनी येऊन दोन-तीन तासांमध्ये आरोपींना पकडले आहे. आम्ही आमच्या शंभर टक्के काम केले आहे. लोकांनी शांततेत राहावे. दोन्ही सण शांततेत सादरी करावेत, असं आवाहन कांवत यांनी केलं आहे.
स्फोट का घडवला?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उरूस मिरवणुकीत झालेल्या किरकोळ वादातून हा स्फोट घडवल्याची माहिती समोर येत आहे. ज्यावेळी स्फोट घडवला, तेव्हा आरोपी दारूच्या नशेत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. गाव शांत आहे. घटनेनंतर मशीद स्वच्छ केली आहे. गावातील सगळे लोक एकत्रित राहत आहोत. कुठलाही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन गावातील मुस्लिम बांधवांनी केलं आहे.