अहिल्यानगर प्रतिनिधी (Ahilyanagar)
विळद पिंप्री ता. नगर येथील सतिश मारूती होडगर या १५ वर्षीय मुलाच्या हातावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी खासदार नीलेश लंके यांच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री सहायता निधीमधून अवघ्या एक दिवसांत एक लाख रूपयांची मदत संबंधित रूग्णालयाच्या खात्यावर वर्ग करण्यात आली.
यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, अहिल्यानगर लोकसभा मतदासंघातील विळद पिंपरी, ता. नगर येथील सतिश मारूती होडगर वय १५ या इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्याथ अपघातात जखमी झाला. अपघातात त्याच्या हाताला गंभीर स्वरूपाची जखम झाल्याने त्यास रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांकडून हातावर शस्त्रक्रीया करावी लागेल असे सांगण्यात आले
होडगर यांच्या घरची आर्थिक स्थिती नाजुक असल्याने विळद पिंप्री येथील खा. नीलेश लंके यांच्या समर्थकांनी खा. लंके यांच्या संपर्क कार्यालयामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे सतीश याच्या शस्त्रक्रीयेसाठी मदतीचा प्रस्ताव सादर केला. संसदीय अधिवेशनानिमित्तताने नवी दिल्लीत असलेल्या खा. लंके यांच्याशी संपर्क करून सतिशच्या शस्त्रक्रियेसाठी तातडीने मदत मिळवून देण्याचे साकडे घालण्यात आले.
खा. लंके यांनी मुख्यमंत्री सहायता कक्षाशी संपर्क करून सतिशच्या शस्त्रक्रियेसाठी तातडीने मदत देण्याची मागणी केली. त्यानुसार एकाच दिवसांत संबंधित रूग्णालयाच्या खात्यावर एक लाख रूपयांची रक्कम वर्ग करण्यात आली.