आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 यवतमाळ

पुणे, अहिल्यानगरला मिळणार नवीन महामार्गाची भेट ! प्रवाशांचा वेळ वाचणार, नितीन गडकरीची घोषणा

नितीन देशपांडे   143   30-03-2025 09:32:17

पुणे (Pcmctahalka.in) Nitin gadkari Road  - 

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. पुण्याला आणि अहिल्या नगरला देखील अनेक महामार्ग प्रकल्प मिळालेत. अहिल्यानगर हे तर उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना रस्ते मार्गाने जोडणारे एक महत्त्वाचे केंद्रबिंदू शहर आहे.

या शहरातुन उत्तरेकडे जाण्यासाठी आणि दक्षिणेकडे जाण्यासाठी अनेक महामार्ग उपलब्ध आहेत. अशातच आता पुणे आणि नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ते म्हणजे केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासाठी एका मोठ्या आणि महत्त्वपूर्ण महामार्ग प्रकल्पाची घोषणा केली आहे.

पुणे, अहिल्यानगरला मिळणार नवीन महामार्गाची भेट ! प्रवाशांचा 5 तासांचा वेळ वाचणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा नवीन महामार्ग तब्बल १५ हजार कोटी रुपये खर्चून उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमधील आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. हा महामार्ग वेगवान आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देईल, ज्यामुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक अधिक कार्यक्षम होईल.

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. पुण्याला आणि अहिल्या नगरला देखील अनेक महामार्ग प्रकल्प मिळालेत. अहिल्यानगर हे तर उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना रस्ते मार्गाने जोडणारे एक महत्त्वाचे केंद्रबिंदू शहर आहे.

या शहरातुन उत्तरेकडे जाण्यासाठी आणि दक्षिणेकडे जाण्यासाठी अनेक महामार्ग उपलब्ध आहेत. अशातच आता पुणे आणि नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ते म्हणजे केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासाठी एका मोठ्या आणि महत्त्वपूर्ण महामार्ग प्रकल्पाची घोषणा केली आहे.

Maharashtra New Expressway

नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला लवकरच पंधरा हजार कोटी रुपयांचा महामार्ग प्रकल्प मिळणार असल्याची घोषणा केली असून हा महामार्ग प्रकल्प राज्यातील पुणे, नगर आणि छत्रपती संभाजी नगर या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे. हा महामार्ग पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा राहणार आहे.

या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल. सध्या पुण्याहून छत्रपती संभाजी नगरला जायचे असेल तर सात तासांचा वेळ लागतो मात्र जेव्हा हा नवा महामार्ग विकसित होईल तेव्हा हा प्रवासाचा वेळ पाच तासांनी कमी होणार आहे. या महामार्गाच्या निर्मितीनंतर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या दोन तासात शक्य होईल.

यामुळे मराठवाड्यातील जनतेला जलद गतीने पुण्यात पोहोचता येणार आहे. संसदेत बोलताना नितीन गडकरी यांनी स्वतः हा नवीन द्रुतगती महामार्ग विकसित करण्याची घोषणा केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की संसदेत ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री महोदयांनी या प्रकल्पाची माहिती दिली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.