पुणे- (GhibliTrend)
घिबली फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या सोपी पद्धत
घिबली फोटो'! लोक आपले रोजचे फोटो घिबली स्टाइलमध्ये बदलून ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर करत आहेत. पण हे घिबली फोटो नेमके आहेत काय आणि ते कसे बनवतात, हे अनेकांना माहीत नाही.घिबली फोटो कसा बनवायचा?
घिबली फोटो बनवणं खूप सोपं आहे आणि तुम्ही ते मोफतही करू शकता. यासाठी AI टूल्सचा वापर केला जातो. खाली स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन दिलं आहे:
AI टूल निवडा:
जर तुमच्याकडे ChatGPT Plus सबस्क्रिप्शन असेल, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण मोफत पर्यायही आहेत, जसं की xAI चं Grok, Gemini AI, किंवा ऑनलाइन साइट्स जसे DeepAI, Craiyon, आणि Playground AI.
Grok साठी: X अॅपवर जा आणि Grok आयकॉनवर क्लिक करा. Grok 3 मॉडेल निवडा.
फोटो अपलोड करा:
तुमचा फोटो निवडा (सेल्फी, मित्रांचा फोटो किंवा काहीही). Grok वर पेपर क्लिप आयकॉनवर क्लिक करून फोटो अपलोड करा. इतर साइट्सवरही अपलोडचा पर्याय असतो.
प्रॉम्प्ट द्या: म्हणजे त्याला सांगा –
फोटो अपलोड केल्यानंतर, लिहा हा फोटो घिबली फोटोमध्ये बनवून द्या. किवा तयार करून द्या. 10 सेकंदात फोटो तयार होईल. त्यानंतर सव्ह करू शकता.
फोटो तयार आणि डाउनलोड:
काही सेकंदांत AI तुमचा फोटो घिबली स्टाइलमध्ये बदलेल. तो फोटो डाउनलोड करा आणि सोशल मीडियावर शेअर करा!
शुल्क आणि मर्यादा
ChatGPT: याची नवीन इमेज जनरेशन सुविधा फक्त Plus, Pro किंवा Team सबस्क्रिप्शनवाल्यांसाठी आहे ($20/महिना). मोफत वापरकर्त्यांसाठी मर्यादा आहेत.
Grok आणि इतर टूल्स: हे मोफत आहेत आणि कोणत्याही सबस्क्रिप्शनशिवाय वापरता येतात. पण काहीवेळा फोटोवर काही बदल हवे असतील, तर हाताने एडिटिंग करावं
#GhibliTrend