पुणे- (IPS Sudhakar Pathare )
मुंबई पोलिस पोर्ट झोनचे डीसीपी डॉ. सुधाकर पठारे यांचे कार अपघातात निधन झाले आहे. हा कार अपघात हैदराबादमध्ये घडला. सुधाकर पठारे हे प्रशिक्षणासाठी हैदराबादला गेले होते.ते २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते.
सुधाकर पठारे हे सध्या मुंबई पोलिसमध्ये कार्यरत होते. त्यांच्यावर पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून जबाबदारी होती. सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैदराबादला गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्या एका नातेवाईकासह ते देव दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळीच हा अपघात झाला. या अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती तेलंगणा पोलिसांना समजली. त्यानंतर ते घटनास्थळी धावत गेले. त्यानंतर झालेल्या अपघाताची बातमी मुंबई पोलिसांना कळवण्या आली आहे.
एसपी नगर कुरनूल वैभव गायकवाड (आयपीएस) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील २०११ चे आयपीएस (डेप्युटी एसपी रिक्रूटमेंट) सुधाकर पठारे आणि त्यांचे सहकारी भाऊ भागवत खोडके यांचे आज तेलंगणातील श्रीशैलम नगर कुर्नूलजवळ झालेल्या रस्ते अपघातात निधन झाल्याचे दुःखद वृत्त आहे.शिवाय अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई ही त्यांनी सेवा दिली. पोलिस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावती येथे ही ते कार्यरत होते. शिवाय पोलिस उपायुक्त म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे शहर या महत्वाच्या ठिकाणी ते होते. पठारे यांनी पोलिस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी , तडीपारी, एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईंचा धडाका लावला होता.या कारवायांमुळे ते ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणी त्यांची नक्कीच आठवण काढली जाते