आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 हिंगोली

रोल्स रॉईस कारच्या खरेदीबाबतचे पुरावे ; तुषार कलाटेंनी दिली महत्त्वाची माहिती

शरद लाटे  163   29-03-2025 17:16:42

पुणे (Rolls Royce Car

महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरुन इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करणारा प्रशांत कोरटकर पोलिसांच्या ताब्यात आहे; 

रोल्स रॉईस कारबद्दल मात्र कोरटकर काहीही माहिती द्यायला तयार नाही. एवढी महागडी गाडी नेमकी कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच धक्कादायक माहिती पुढे येत आहे. प्रशांत कोरटकरच्या आलिशान आणि वादग्रस्त रोल्सरॉईस गाडीचा शोध पोलीस घेत आहेत. पिंपरी चिंचवडचे बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्याकडे ही रोल्स रॉईस गाडी असल्याचं समोर आलं आहे. तुषार कलाटे यांच्या मुळशीच्या फार्म हाऊसवर ही गाडी असल्याचं एबीपी माझाच्या हाती लागलेल्या व्हिडीओमधून दिसून येतं आहे. WB-02-AB123 या क्रमांकांच्या या रोल्स रॉईससोबत तुषार कलाटे यांचे फोटो देखील आहेत. तर दुसरीकडे कलाटे यांनी ही कार त्यांच्याकडे आहे हे मान्य केलं आहे. त्यांनी ती एका बँकेच्या लिवालामध्ये विकत घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ही कार कलाटे यांच्याकडे कशी आली याची माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितली आहे.

ते म्हणाले ही रोल्स रॉईस कार प्रशांत कोरटकरची नाही तर ती माझी आहे. ही कार मी 2017 रोजी घेतलेली आहे आणि ती माझीच आहे. प्रशांत कोरटकर हे तीन ते चार महिन्यांपूर्वी माझ्याकडे माझ्या एका मित्रासोबत आला होता, त्यावेळी आमची ओळख झाली. कोरटकर पत्रकार असल्याचं त्यांनी सांगितलं. गाडी पाहून कोरटकर म्हणाले, मी त्या गाडीसोबत एक फोटो काढू का? मी म्हटलं काढा. काही हरकत नाही. त्याच्या व्यतिरीक्त माझा त्याच्याशी काहीही कसलाही लांबपर्यंत संबंध नाही.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.