आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 रत्‍नागिरी

लाचखोर नव्हे हे तर हरामखोर…! लाचखोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने एकदा ‘हे’ करावंच

शिंदे राम   87   28-03-2025 20:34:09

अहिल्यानगर 

लाज, शरम, अब्रू, स्वाभिमान, जबाबदारीचं भान असं काहीही माहीत नसलेल्या आणि केवळ स्वार्थ, हावरटपणा अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात पूर्णतः नंगानाच चालविलेला आहे. या लोकांचा हावरटपणा अजिबात थांबायला तयार नाही. सर्वसामान्यांकडून जे लोकसेवक लाच घेतात, त्यांना लाचखोर म्हटलं जातं. मात्र लाचखोरीच्या अनेक घटनांनंतरदेखील पुन्हा नव्याने जे लाच घ्यायला लगेच तयार होतात, अशांना लाचखोर नव्हे तर हरामखोर म्हणायला हवंय. सरकारनं अशा लोकांचे काय करायला पाहिजे, याविषयी आम्ही सदरच्या बातमीत सांगत आहोत. तूर्तास लाचखोरीच्या या घटनेविषयी तुम्ही प्रथमत: जाणून घ्या.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत भुजलाशयीन पिंजरा मत्स्यसंवर्धन हा केंद्र सरकारचा प्रकल्प एका दाम्पत्याच्या नावावर मंजूर झाला. विशेष म्हणजे शासनाच्या अटी आणि शर्तीनुसार या प्रकल्पाचे कामदेखील पूर्ण झालेलं आहे. या दांपत्याला आतापर्यंत तीन लाख 88 हजार आठशे रुपये अनुदान प्राप्त झालेलं आहे. तसेच या दांपत्यातल्या व्यक्तीच्या बहिणीलाही 29 लाख 96 हजार अनुदान प्राप्त झालेलं आहे.

 

या दोन्ही प्रकल्पाचं उर्वरित अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे. हे उर्वरित अनुदान मिळावं, यासाठी या तक्रारदारांनी रमेशकुमार जगन्नाथ धडील (सहाय्यक आयुक्त वर्ग १, मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) ) या लोकसेवकामार्फत प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र धडील या लोकसेवकाने तक्रारदाराकडे चाळीस हजार रुपयांची लाच मागितली. या लाचेतला वीस हजारांचा पहिला हप्ता घेताना या लाचखोर नव्हे तर  हरामखोर रमेशकुमार जगन्नाथ धडील नावाच्या अधिकाऱ्याला राहुरी तालुक्यात एका कार्यक्रमामध्ये रंगेहाथ पकडण्यात आलं.

आता अशा लाचखोर अधिकाऱ्यांना अँटी करप्शन विभागाने नुसतीच अटक करून पोलिसांच्या ताब्यात देऊन काहीच उपयोग नाही. कारण यांना माहीत असतं, यामध्ये काहीच होत नाही. परंतु सरकारने यासाठी पोलिसांना असा आणावा, की जे लाचखोर लाच घेताना पकडण्यात येतील, त्यावेळी पोलिसांच्या ताब्यात देत असतानाच संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांसह  कर्मचाऱ्यांनी अशा लाचखोर अधिकाऱ्यांची गावभर धिंड काढावी. असं झाल्यास कोणीही लाच घ्यायला धजावणार नाही.

सौजन्य - बाळासाहेब शेटे, लोकपत


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.