आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 सांगली

जिल्ह्यात दहशत बसवण्यासाठी आकाच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख यांचा खून," Suresh Dhas यांचा मोठा आरोप

शरद लाटे  46   28-03-2025 20:30:35

पुणे- (Pcmctahalka.in) 

Santosh Deshmukh murder case) दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. नुकतीच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात सुनावणी पार पडली. आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारने पोलिसांना दिलेल्या जबाबाची माहिती समोर आली आहे.सुग्रीव कराड (Sugriv Karad) याच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुले याला मारहाण केली, असा जबाब जयराम चाटे आणि महेश केदार याने पोलिसांना दिला आहे. यावर आता भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“कोण आहे हा सुग्रीव कराड? त्याचा या प्रकरणात काहीही संबंध नाही. आकाच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांचा खून झाला, हे आरोपींनी कबुल केले आहे. संतोष देशमुख यांची इतक्या क्रूरपणे हत्या केली, अशी कोणाचीही हत्या झाली नसेल,” अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली आहे.

दरम्यान, जयराम चाटे आणि महेश केदार याने कबुली जबाबात एका नवीन व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला आहे. सुग्रीव कराडने यांना मारा आणि हाकलून लावा असे सांगितल्यानंतर संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुले याला 6 डिसेंबरला आवादा कंपनीच्या परिसरात मारहाण केली होती.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.