बीड जिल्ह्यात रोजगार हमीचे तीन तेरा; विहिरीसाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट
बीड - (BEED NEWS) महाराष्ट्राने नव्या आर्थिक वर्षात पदार्पण केले आहे. २०२० मध्ये भारत महासत्ता होणार हे स्वप्न डोळ्यांत घेऊन शिक्षण घेणाऱ्या तरुणांच्या वाट्याला आज २०२४-२५ मध्ये बेरोजगारीचे क्रूर वास्तव आले आहे.
बांधावर किंवा बाजार समितीत आपला शेतमाल नगदी विकला जाईल, शेतीमालाला रास्त भाव मिळेल, आर्थिक स्थिती सुधारेल, हे शेतकऱ्यांचे स्वप्न डोळ्यांतल्या अश्रूंनी वाहून गेले आहे. निवडणुकांच्या वेळी आश्वासनांचा पाऊस पडतो, शेतकऱ्यांसह सर्व लोक सुखाची स्वप्ने पाहतात. मग सत्तांतर होते, आश्वासने विसरली जातात. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांच्या स्वप्न पाहणाऱ्या डोळ्यांत अश्रू कायमच राहतात.
सुखी आणि संपन्न राज्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाट्याला हालाखीचे आणि उपेक्षेचे दिवस आले आहेत.
रोजगार हमीच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना राज्य सरकारने सक्षमपणे राबवले आहेत मात्र ग्रामपंचायतीचे सरपंच, गटविकास अधिकारी, इंजिनीयर, रोजगार सेवक, हे सर्रासपणे लूट करताना दिसून येत आहेत, 25000 द्या आणि पाच लाखाची विहीर घ्या, दीड लाखाचा गाय गोठा घ्या दहा हजार रुपये द्या अशा अनोख्या वापर गावगाड्यात पाहताना दिसून येत आहेत यामध्ये सर्रासपणे अधिकारी इंजिनीयर रोजगार सेवक शेतकऱ्यांची आर्थिक लूट करताना दिसून येत आहेत.
एका गावात 100 200 विहिरी सरपंच सर्रासपणे कागदपत्रे गोळा करून वन टाइम पंचवीस हजार रुपये घेतात, राज्य सरकारची चांगली योजना ही शेतकऱ्याच्या नव्हे तर दलालाच्या कामाची आहे असे देखील बोलले जात आहे.
बीड जिल्ह्यात सर्रासपणे बोगस बिले देखील उचलण्याचे काम सरपंच व गटविकास अधिकाऱ्याच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे, यावर आता नक्की काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.