आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 वर्धा

मुलीची छेड काढू नको...', विचारायला गेलेल्या बापाची भर दिवसा हत्या

नितीन देशपांडे   102   28-03-2025 17:17:42

पुणे- (Pcmctahalka.in) नागपूरच्या इमामवाडा भागात धक्कादायक घटना घडली आहे. मुलीची छेड काढण्याला विरोध केला म्हणून वडिलांची नागपूरच्या भर चौकात निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. काही गुन्हेगार मुलीला सतत त्रास देत होते, म्हणून वडिलांनी याचा विरोध केला, तेव्हा आरोपींनी भर रस्त्यात वडिलांची हत्या केली.

मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव नरेश वालदे असून ते 53 वर्षांचे होते. नरेश वालदे यांचा रंगकामाचा व्यवसाय होता. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काही तरुण बराच काळापासून नरेश यांच्या मुलीला त्रास देत होते, मुलीने हे घरी सांगितल्यानंतर नरेश यांनी या मुलांना विरोध केला, तेव्हा त्यांचे आरोपींसोबत वाद झाले. यानंतर आरोपींनी नरेश यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

बुधवार, 26 मार्चला नरेश वालदे त्यांच्या कामात व्यग्र असताना त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला आणि जट्टारोडी परिसरात भेटायला बोलावलं, यानंतर नरेश तिथे गेले असता आरोपी आधीच तिथे टपून बसले होते. नरेश दिसताच आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि पळून गेले. हा हल्ला इतका जीवघेणा होता की नरेश यांचा जागीच मृत्यू झाला.

नरेश वालदे हे त्यांच्या वृद्ध आई आणि तीन मुलींसोबत इमामवाडा परिसरात राहतात. आरोपी अनेक दिवसांपासून मुलीला त्रास देत होते, त्यामुळे दोघांमध्ये आधीच वाद झाला होता. काही दिवसांपूर्वी अज्ञात लोकांनी नरेश यांच्या घरावर दगडफेक केली होती, ज्याची तक्रार इमामवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती, पण पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.