आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 मुंबई शहर

रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी आमदार सुनील शेळके याची निवड

नितीन देशपांडे   49   28-03-2025 12:24:15

पुणे- (Pcmctahalka.in) आमदार सुनील शेळके यांची महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्या स्वाक्षरीने आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

सुनील शेळके यांच्या या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मावळ विधानसभा क्षेत्रातून सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले सुनील शेळके हे सामाजिक कार्यात सक्रीय असून मागील काही वर्षांपासून त्यांनी ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली रोजगार हमी योजनेत ठोस उपाययोजना व नवीन प्रकल्प राबविले जातील, असा विश्वास व्यक्त करीत नागरिकांनी निवडीचे स्वागत केले आहे.

निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार सुनील शेळके म्हणाले, ‘ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना रोजगार मिळावा आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नव्या योजना आणण्याचा माझा मानस आहे.’


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.