भोसरी प्रतिनिधी ::- महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भाजपाकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात जात आहेत याच पार्श्वभूमीवर
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची सक्रिय सदस्यता अभियान अंतर्गत बैठक भारतीय जनता पार्टीचे नेते श्री.राजेशजी पांडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली,
बैठकीत जास्तीत जास्त सक्रिय सदस्यांची नोंदणी करण्यासाठी उपयुक्त उपाययोजना आणि रणनीतींवर सखोल चर्चा करण्यात आली ३१ तारखेपर्यंत सदस्यसंख्या वाढवण्याचे आवाहन श्री.राजेशजी पांडे यांनी केले.

या वेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप, संघटनमंत्री श्री.मकरंद देशपांडे, आमदार सौ.उमाताई खापरे, भाजप जिल्हा कार्यकारी अध्यक्ष श्री.शत्रुघ्न(बापू)काटे, माजी अध्यक्ष श्री.सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य श्री.मोरेश्वर शेंडगे, सरचिटणीस श्री. शितल शिंदे ,श्री.नामदेव ढाके, सौ.वर्षाताई डहाळे, श्री.काळुशेठ बारणे ,श्री.चंद्रकांत नखाते, श्री.राजू दुर्गे ,श्री.संजय मंगोडेकर ,श्री.मनोज ब्राह्मणकर ,श्री.राज तापकीर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.