पुणे- (Pcmctahalka.in) स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने आता अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यावर निशाणा साधलाय. कामराने आज एक नवा व्हिडिओ शेअर केलाय. यात त्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना 'सॅलरी चोरणारी दिदी' असं म्हटलंय.
हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये केलेल्या कार्यक्रमाचाच हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना 'साडीवाली दिदी' म्हणत कामराने त्यांच्या आर्थिक धोरणांवर टीका केलीय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर व्हिडिओ केल्यानंतर कुणाल कामरा वाद सापडलाय. गाण्यातून शिंदेंवर टीका केल्याने शिवसैनिकांकडून त्याला धमकी दिली जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंवर केलेला व्हिडिओची चर्चेत असताना त्याच्या नवीन व्हिडिओची क्लिप व्हायरल होत आहे. अर्थमंत्र्यांवर टीका करणारा व्हिडिओ दीड मिनिटांचा आहे.
हिंदी चित्रपटातील 'हवा हवाई' गाण्यावरून कुणाल कामराने अर्थमंत्र्यांच्या आर्थिक धोरणांवर टीका केलीय. दरम्यान उपमुख्यमंत्र्यांवर विडंबनात्मक काव्य करत त्यांच्यावर टीका करण्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा कामराला नोटीस दिलीय. याआधीही मंगळवारी त्याला नोटीस बजावण्यात आली होती. रविवारी एका कार्यक्रमात कामराने उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता 'देशद्रोही', 'ठाणे की रिक्षा' अशी टीका केली होती. या कार्यक्रमानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली होती. त्यानंतर पुन्हा एक गाण्याचा व्हिडिओ व्हायरल करत कामराने शिवसेना आणि सरकारला डिवचलं होतं.