आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पुणे शहर

10व्या अनुसूचीची थट्टा ठरेल! महाराष्ट्रातील राजकारणावर SC ची महत्त्वाची टिप्पणी

नितीन देशपांडे   45   26-03-2025 16:39:02

पुणे (Pcmctahalka.in) 

दोन वर्षात राजकीय परिस्थिती कमालीची बदलली आहे. महाराष्ट्रात आयाराम गयारामची परिस्थिती इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे.तसेच पक्षांतराच्या बाबतीत न्यायालयांनी हस्तक्षेप नाही केला तर संविधानातल्या 10 व्या अनुसूचीची थट्टा होईल असेही कोर्टाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयात भारत राष्ट्र समितीच्या तीन आमदारांच्या निलंबनावर सुनावणी सुरू होती. तेव्हा कोर्टाने म्हटलं की आयाराम गयाराम ही संस्कृती हरयाणातून आली होती. पण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आयाराम गयारामची संख्या जास्त आहे. या प्रकरणात जर कोर्टाने वेळीच हस्तक्षेप केला नाही तर संविधानाच्या 10 व्या अनुसूचीची थट्टा होईल. तसेच आपल्या देशाची लोकशाही ही सशक्त आहे, महाराष्ट्रात गेली पाच वर्ष जे काही झालं त्यामुळे या लोकशाहीचे अनेक रंग दिसले असेही कोर्टाने म्हटलं. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 लोकांच्या प्रतिक्रिया


PCMC तहलका
Dattatray T Ghadge 27-03-2025 09:23:43

दिल्लीतील हायकोर्ट न्यायाधीश प्रदीप वर्मा.... कथित १५ कोटी लाचेचं प्रकरणी लक्ष द्यावे....& मुख्य न्यायाधीश "कोटुंबिक सरंजामी काॅलेजियम पद्धत बंद करून..मेरीट मधून नियुक्ती करण्यात यावी ✌️🙏


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.