पुणे- (Pcmctahalka.in)
मूळचा बीडचा असलेला एक तरुण गेल्या 35 वर्षांपासून पुण्यात होता. काही दिवसांपूर्वी या तरुणाने पत्रकार परिषद घेतली अन् सत्ताधारी पक्षातील आमदारावर गंभीर आरोप केले.मुख्यमंत्र्यांनी संबंधित आमदाराचा राजीनामा घेऊन कायदेशीर कारवाई करावी, नाहीतर 26 मार्चला आत्मदहन करेन, असा इशारा दिला होता. मात्र, 25 मार्च रोजी तरुणाच्या पत्नीला फोन आला अन् माझं अपहरण झालंय, असं तरुणाने स्वत: पत्नीला सांगितलं. घाबरलेल्या पत्नीने पोलिसांना तातडीने याची माहिती दिली अन् पोलीस कामाला लागले. तरुणाच्या अपहरणानंतर पोलिसांची देखील भंबेरी उडाली.
शेवटचे मोबाईल लोकेशन शोधलं अन्...
काही लोक मला घेऊन चाललेत, अशी माहिती तरुणाने पत्नीला दिला अन् नंतर त्याचा फोन बंद लागला. तरुणाच्या पत्नीने वारजे माळवाडी पोलिसांची मदत घेतली अन् पत्रकार परिषदेची घटना सांगितली. प्रकरण मोठं वाटत असल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तरुणाचं शेवटचे मोबाईल लोकेशन दुपारी 1 वाजून 49 मिनिटांनी गहुंजे येथे दिसलं. पोलिसांनी गहुंजे येथे शोधाशोध केली पण हाती काही लागलं नाही. अखेर मध्यरात्रीनंतर संबंधित तरुण शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये सापडला. त्यावेळी पोलिसांनी जे काही ऐकलं ते पाहून पोलिसांचं डोकं चक्रावलं.