आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 नंदुरबार

Khoka Boka खोका, बोका, चोखा" सगळे उघड होणार ! सुरेश धसचे मुंडेंना आव्हान

शिंदे राम   62   26-03-2025 12:22:36

पुणे (Pcmctahalka.in) पोरांना पुढे का करता, तुम्ही स्वतः समोर येऊन माझ्यावर बोला, खोका, बोका, चोखा Khoka Boka Chokha Challenge सगळे सापडतील, अशा शब्दात सुरेश धस यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आव्हान दिले.विधानभवन परिसरात ते प्रसार माध्यमाशी बोलत होते. संतोष देशमुख यांच्या मारहाणीची पाशवी दृश्य समोर आल्यानंतर राज्याचे अन्न व पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.राजीनाम्यानंतर आठवड्याभरात धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे मैदानात उतरले. धनंजय मुंडेंवर सुरेश धस यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत खोक्या प्रकरणात सुरेश धसांना सहआरोपी करा, अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, सतीश भोसले उर्फ खोक्याला Khoka Boka Chokha Challenge प्रयागराजमधून अटक करण्यात आली. अजय मुंडेंच्या त्या आरोपांवर सुरेश धस यांनी प्रत्युत्तर देत अजय मुंडे अजून लहान आहे. धनंजय मुंडे यांनी याला त्याला बोलवायला लावण्याऐवजी स्वतः समोर येऊन बोलावे, असे म्हणत धनंजय मुंडेंना त्यांनी आव्हान दिले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.