पुणे- (Pcmctahalka.in)
पोलीस दलात आता एका पीएसआयचे निलंबन करण्यात आले आहे. रणजीत कासले असे या पीएसआयचे नाव असून परराज्यात तपासाकरिता गेले असता तडजोड करत पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता.यानंतर हा विषय राज्यस्तरापर्यंत पोहोचला होता. या प्रकरणाची चौकशी करत आता कासले यांच्या निलंबनाचे आदेश नवनीत कावत यांनी काढले आहेत.
दरम्यान निलंबनाचे आदेश निघताच कासले यांनी वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल केले. पोलीस अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांवर देखील आरोप करत या सगळ्यांची चौकशी करावी अशी मागणी केली. कालच बीड पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता ही कारवाई झाल्याने याची चर्चा होऊ लागली आहे.