पुणे (Pcmctahalka.in) बांधकाम कामगारांना त्यांच्या 60 वर्षे वयानंतर पेन्शन मिळणार आहे. राज्याचे श्रमविभाग तथा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधिमंडळात याबाबत मोठी घोषणा केली.बांधकाम क्षेत्रातील कामगारांसमोर निवृत्तीवेतनाची मोठी समस्या होती. राज्य सरकारने या कामगारांचा सहानुभूतीने विचार केला.
कामगारांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं भवितव्य सुरक्षित व्हावं यासाठी कामगारांना पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधिमंडळ सभागृहात या निर्णयाची माहिती दिली. मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांन दरवर्षी 12 हजार रुपये निवृत्तीवेतन देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री फुंडकर यांनी केली.