पुणे- (Pcmctahalka.in)
पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. आज (25 मार्च) त्यांचा एकट्याचा अर्ज दाखल होता आणि छाननीत हा अर्ज वैधही ठरला.उद्या (26 मार्च) रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे बनसोडे यांची उपाध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा करणार आहेत.विधानसभेचे अध्यक्षपद आणि विधानपरिषदेचे सभपतीपद भाजपकडे आहे. तर विधान परिषदेचे उपसभापतीपद शिवसेनेकडे (Shivsena) आहे. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. यापूर्वी हे पद राष्ट्रवादीच्याच नरहरी झिरवाळ यांच्याकडे होते. यावेळी सामाजिक समतोल साधण्यासाठी अनुसूचित जात प्रवर्गाला उपाध्यक्षपद देणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार बनसोडे यांना संधी देण्यात येणार आहे.