पुणे- (Pcmctahalka.in) सतिश भोसले उर्फ खोक्याला आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याला न्यायालयीन कोठडीत दाखल करण्यापूर्वी कारागृहाच्या आवारातच त्याची कार्यकर्त्यांनी शाही बडदास्त ठेवली.
बीड पोलीस एसपींना देखील घाबरत नाहीत
खोक्याची जेलच्या आवारात शाही बडदास्त
बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यासाठी कारागृहाच्या आवारात खोक्या अनेक कार्यकर्त्यांना मुक्तपणे भेटत असून त्याच्यासाठी जेवणाचे खास डब्बे आल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. कार्यकर्त्यांच्या भेटी, गाठी, जेवण आणि मोकळे वातावरण याचा आस्वाद खोक्या घेताना दिसत आहे.
पोलीस चौकशीत खोक्याचे अनेक कारनामे समोर
अनेकांना मारहाण करणारा आणि शिकारीच्या छंदातून अनेक वन्यजीवांचे जीव घेतल्याचा आरोप असलेला खोक्या उर्फ सतीश भोसले सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. खोक्याला प्रयागराजमधून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. पोलीस चौकशीत खोक्याचे अनेक कारनामे समोर येत आहेत महागड्या गाड्यांमध्ये बसून पैशांची बंडलं उडवण्याचा त्याचा माज स्पष्ट दिसतो. त्याला पोलिसांचा कसलाही धाक नाही हे विशेष. पैशांची बंडलं उडवताना त्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. काहींना वाटेल की हा भुरटा गुंड आहे. पण तसं नाही... त्याने शाळेचं तोंड पाहिलंय की नाही माहिती नाही. त्याचा कामधंदा काय माहिती नाही पण तो हेलिकॉप्टरने फिरतो... मुंबईत त्याचा मुक्काम पंचतारांकीत हॉटेलात असतो.