आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 नाशिक

बाणेर बालेवाडीचा विद्युत केंद्राचा प्रश्न सुटणार मुख्यमंत्र्यांकडून प्रतिसाद

शिंदे राम   431   24-03-2025 18:17:21

पुणे प्रतिनिधी- (Pune news) पुणे महानगरपालिका हद्दीतील स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास आलेला बाणेर बालेवाडी भागातील विद्युत समस्याला परिसरातील नागरिक अनेक वर्षापासून सामोरे जात आहेत,

मात्र त्यांना दिलासादायक बातमी मिळाली आहे वारंवार होणाऱ्या विद्युत समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका ज्योतीताई गणेश कळमकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दाखवला असून तातडीच्या उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

नगरसेविका ज्योतीताई कळमकर व पुणे शहराचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते गणेश कळमकर यांच्या मागणीला मोठे यश आले आहे. यावेळी नगरसेविका ज्योतीताई कळमकर म्हणाल्या की बाणेर बालेवाडी भागातील नागरिकांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते त्यामुळे हे उपकेंद्र तातडीने सुरू करणे आवश्यक होते याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बाणेर-बालेवाडी भागातील वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. ज्योती गणेश कळमकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. बालेवाडी (पुणे) येथील केबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सर्वे क्रमांक ४ मधील विद्युत विभागाला दिलेल्या जागेत विद्युत उपकेंद्राचे (सबस्टेशन) काम तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

बाणेर-बालेवाडी स्मार्ट सिटी भागासाठी हे उपकेंद्र अत्यंत महत्त्वाचे असून, या भागाला सध्या अपुरा वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. विजेची समस्या सुटण्यासाठी आवश्यक उपकेंद्र पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याने, हे काम त्वरित सुरू होणं गरजेचे होते त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना हे काम सुरू होण्यासाठी निर्देश द्यावे म्हणून पत्र दिले. मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेत 24 तासाच्या आत मध्ये संबंधित विभागाला निर्देश दिले.

गणेश कळमकर (सरचिटणीस: भाजपा पुणे शहर)

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.