आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 चंद्रपूर

Pune जिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांचे निधन; घेतला अखेरचा श्वास

शिंदे राम   428   24-03-2025 16:14:00

पुणे (Pune news) प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी, पीएमआरडीएच्या अपर जिल्हाधिकारी स्नेहल रवींद्र बर्गे (वय- 48) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई व बहीण असा परिवार आहे.

कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ख्याती मिळवलेल्या स्नेहल बर्गे यांनी हवेली तालुक्याच्या प्रांतधिकारी म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.

स्नेल बर्गे यांची कारकीर्द अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली. अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीवर त्यांनी कडक कारवाई करून आपली निष्ठा दाखवली होती. विशेष म्हणजे, त्यांच्या बहीण पल्लवी बर्गे या सध्या पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.