आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 सांगली

'आमदार आपल्या दारी’ उपक्रमाचा चिंचवडकरांनी लाभ घ्यावा ::- शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे

नितीन देशपांडे   10458   24-03-2025 15:58:41

'आमदार आपल्या दारी’ उपक्रमाचा चिंचवडकरांनी लाभ घ्यावा ::- शत्रुघ्न बापू काटे

चिंचवड प्रतिनिधी -: चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शंकरशेठ जगताप यांच्या नेतृत्वाखाली आमदार आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे; या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे; यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने आमदार आपल्या दारी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केली आहे

नागरिकांच्या समस्या आणि तातडीचे निराकरण

या उपक्रमात नागरिकांनी विविध विभागांशी संबंधित तक्रारी मांडल्या. यामध्ये अतिक्रमण, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, वीजपुरवठा समस्या, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांशी संबंधित अडचणींचा समावेश होता. नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महानगरपालिका, महावितरण, पाणीपुरवठा विभाग आणि इतर शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

K-विला सोसायटीच्या नागरिकांनी कचरा डेपो संदर्भात तक्रार नोंदवली, ज्यामुळे जवळपास 1000-2000 कुटुंबांवर परिणाम होत होता. या तक्रारीची तातडीने दखल घेत महापालिका अधिकाऱ्यांना हा डेपो स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, रेशन कार्ड संदर्भात ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत करण्यास सांगण्यात आले.

शासकीय योजनांची माहिती आणि मदत

कार्यक्रमादरम्यान नागरिकांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, वयाचा दाखला, रेशन कार्ड अर्ज आणि दुरुस्ती यांसाठी मदत करण्यात आली. तसेच, सरकारी योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या उपक्रमास जवळपास दोन ते अडीच हजार नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी थेट आमदार आणि अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या. अनेक समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात आले, तर काही समस्यांवर लवकरच कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही आमदार शंकर जगताप यांनी दिली. त्यांनी नमूद केले की, “संवाद, सेवा, समर्पण हा भाव ठेवून हा उपक्रम राबवला जात आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहून जनसेवेचा माझा उत्साह अधिक वाढला आहे.”

या कार्यक्रमास महापालिका आणि इतर शासकीय विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यास मदत झाली असून, हा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवला जाईल, असे आमदार शंकर जगताप यांनी स्पष्ट केले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 लोकांच्या प्रतिक्रिया


PCMC तहलका
Rajshri Ashok Walikar 24-03-2025 17:38:42

👍👌

PCMC तहलका
Rajshri Ashok Walikar 24-03-2025 17:38:43

👍👌

PCMC तहलका
Jagdish Jadhao 25-03-2025 01:47:22

Super


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.